बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

बोडखा, काकोडा येथील नागरिक संतप्त,भोन ते वसाडी नवीन रस्त्याच्या कामाला पिवळ्या मातीचा वापर…नागरिकांचा उपोषणाचा इशारा.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
संग्रामपूर प्रतिनिधी
संगीता उमाळे.
दि.२/९/२०२६.
संग्रामपूर तालुक्यातील नवीन भोन ते नवीन वसाडी या रस्त्याचे काम काही दिवसापासून सुरू आहे. रस्त्याचे रुंदीकरण करत असताना रस्त्याच्या कडेला भरवण्यासाठी पिवळ्या मातीचा आणि अल्प मुरूमाचा वापर होत आहे. तसेच बोडखा. कवठळ. काकोडा रस्त्याच्या दोन्ही बाजूला आवश्यक तेपेक्षा कमी खोदकाम करून त्यामध्ये पिवळी माती टाकण्यात येत असल्यामुळे बोडखा . काकोडा येथील नागरिकांनी काम थांबवून संबंधित कर्मचाऱ्यांना जा विचारले.

बोडखा काकोडा या रोडवर किमान एक ते दोन इंच इतका मुरूम टाकण्यात आला असल्याने भविष्यात रस्त्याचे काम टिकणार नाही असा आरोप करत कामाच्या बाबतीत नागरिकांनी तात्काळ काम थांबविले.

रस्त्यावर टाकलेली पिवळी माती हटवून दर्जेदार साहित्याचा वापर करावा. अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार आवश्यक खोदकाम करावे. अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.
त्याचप्रमाणे कामा संदर्भात कंत्राटदाराचे नाव . कामाची किंमत. कामाची मुदत. मजूर आराखडा दर्शविणारा माहिती फलक आता पर्यंत लावलेला नसून तो तात्काळ लावून संबंधित कामाची संपूर्ण माहिती सार्वजनिक करावी.
शासकीय निकष प्रमाणे अंदाजपत्रका नुसार रस्त्याचे काम न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला.

अशी मागणी किसान सेना उपजिल्हाप्रमुख अमोल ठाकरे. राहुल उमाळे. राजेंद्र खरोडे. सदानंद मान खैर. वैभव ठाकरे. भीमाशंकर कातव. प्रशांत तेल्हारकार. महादेव कोकाटे. भागवत सावरकर. किरण मोहाडे. सागर आढाव. रूपा कौलकार. मंगेश काळमेघ यांनी केली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button