बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

दिव्यांगांच्या स्वावलंबी जीवनाच्या दिशेने सार्थक पुढाकार

JJ Plus Hospital मध्ये निःशुल्क कृत्रिम अवयव मोजमाप शिबिर; आगामी दोन महिन्यांत अवयवांचे वितरण

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा; दिनांक 2 सप्टेंबर 26दिव्यांगांना स्वावलंबी व सन्मानाचे जीवन जगण्यासाठी सहकार्य करण्याच्या उद्देशाने 30 ऑगस्ट 2026 रोजी JJ Plus Hospital, जिल्हा न्यायालयासमोर, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर येथे निःशुल्क कृत्रिम अवयव मोजमाप शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरात गरजू 566 दिव्यांग लाभार्थ्यांची नोंदणी करून त्यांच्या गरजेनुसार कृत्रिम अवयवांसाठी मोजमाप घेण्यात आले. आयोजकांच्या माहितीनुसार, घेतलेल्या मोजमापानुसार तयार करण्यात येणारे कृत्रिम अवयव आगामी दोन महिन्यांत सर्व संबंधित लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहेत.

या सेवाभावी उपक्रमासाठी JJ Plus Hospitalच्या वतीने प्रसिद्ध न्यूरोसर्जन व रुग्णालयाचे संचालक डॉ. जीवन राजपूत यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले.

जायंट्स ग्रुप, छत्रपती संभाजीनगरच्या वतीने अध्यक्ष देवेंद्र सेठ, कोषाध्यक्ष जीवराज पटेल, सचिव विष्णू राऊत, विशेष समिती सदस्य सूर्यमाला मलानी व विनोद शेवतेकर यांनी सक्रिय सहभाग घेतला.

तसेच साधू वासवानी मिशन, पुणेच्या वतीने मिलिंद जाधव व त्यांच्या संपूर्ण तांत्रिक पथकाने कृत्रिम अवयवांचे मोजमाप व तांत्रिक प्रक्रियेत महत्त्वपूर्ण योगदान दिले.

श्री हरिवंश राय बच्चन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, पारधच्या वतीने अध्यक्ष मनीष भैया श्रीवास्तव, तसेच शिवसेना जालना जिल्हाप्रमुख, आणि सचिव विक्रांत श्रीवास्तव यांनी गरजू लाभार्थ्यांना शिबिराशी जोडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

शिबिराचे मुख्य समन्वयक हरि नारायण पचौरी व त्यांच्या संपूर्ण सहकार्य पथकाने लाभार्थ्यांशी संपर्क, नोंदणी, समन्वय तसेच शिबिरातील विविध व्यवस्थांचे सुरळीत नियोजन केले.

शिबिरासाठी उपस्थित लाभार्थी व स्वयंसेवकांसाठी भोजन व अल्पोपहाराची व्यवस्थाही करण्यात आली होती.

आयोजकांनी सांगितले की, हा उपक्रम केवळ कृत्रिम अवयव उपलब्ध करून देण्यापुरता मर्यादित नसून, दिव्यांगांना गतिशीलता, आत्मविश्वास आणि स्वावलंबनाची संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या शिबिराचे यश विविध सामाजिक संस्था, सेवाभावी व्यक्ती, वैद्यकीय तज्ज्ञ, तांत्रिक पथक व स्वयंसेवक यांच्या सामूहिक सहकार्याचे व सेवाभावाचे फलित आहे. आगामी दोन महिन्यांत कृत्रिम अवयवांचे वितरण करून या सेवा अभियानाचा पुढील टप्पा पूर्ण करण्यात येणार आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button