बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

पोलिसांची मोठी कारवाई खामगांव शहरात अवैध जुगार अड्ड्यावर छापा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी: गजानन तांगडे खामगांव

खामगाव शहरांमध्ये दोन ठिकाणी अवैद्य जुगार अड्डावार छापा मारून 11 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले.
दोन कारवायांमध्ये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण सुमारे 50 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एमआयडीसी परिसरात राठी ऑइलमिला समोर रस्त्याच्या कडेला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला असता या कारवाईत सात जणांकडून रोख रक्कम व विविध कंपन्यांचे मोबाईल व ताशपत्ते असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. व दुसऱ्या कारवाई मध्ये पिंपळगाव राजा रोडवर घाटपुरी शिवारात सार्वजनिक ठिकाणी चार जण जुगार खेळत असताना आढळून आले. व त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण 5हजार 260 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या दोन्ही प्रकरणात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button