लोकसेवक मधुकरराव चौधरी कॉलेज ऑफ फार्मसी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

लोकसेवक मधुकरराव चौधरी कॉलेज ऑफ फार्मसी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
फैजपूर प्रतिनिधी
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काल म्हणजेच ६ डिसेंबर रोजी ६६ वा स्मृतिदिन होता. १९५६ साली याच दिवशी दिल्ली येथील राहत्या घरी महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांनी अखेरचा श्वास घेतला होता. याच दिवसाला महापरिनिर्वाण दिन म्हटले जाते.
सदर ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त माननीय लोकसेवक मधुकरराव चौधरी औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय फैजपूर येथे या महामानवाला आदरांजली वाहण्यात आली.
या ६६ व्या महापरिनिर्वाण
दिनानिमित्त सदिच्छा भेटीला आलेले इंडाला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन, कल्याणचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. विजय महाजन, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील, उपप्राचार्य डॉ. आर. वाय चौधरी व इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तसेच मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी अभिवादन केले. या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त
महाविद्यालयाला
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील सर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर या निष्णात कायदेतज्ञ, समाजशास्त्रज्ञ, राज्यशास्त्रज्ञ, अर्थतज्ञ, थोरलेखक यांच्या जीवन कार्याविषयी विविध आठवणींना उजाळा देत महाविद्यालयातील विद्याथ्र्यांना
डॉ. बाबासाहेब म्हणजे ज्ञानाचे प्रतीक – प्रा. व्ही. आर. पाटील
याप्रसंगी लोकसेवक मधुकरराव चौधरी कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ज्ञानाचे प्रतीक असे म्हणतात. त्यांच्या ज्ञानाचे दाखले जगभरात दिले जा तात. त्यांच्या इतका बुद्धिमान माणूस गेल्या अनेक वर्षात झाला नाही असे अनेक विद्वान सांगतात. भारतीय राज्यघटना लिहून त्यांनी त्यांच्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवून दिलेली आहे. या गोष्टींची जाणीव ठेवून त्यांना अभिवादन करताना तळागाळातील समाजाच्या न्यायासाठी कटिबद्ध राहिले पाहिजे असा निश्चय आपण सर्वांनी मिळून करुया असं देखील यावेळी प्रा. पाटील म्हणाले.




