महाराष्ट्रविदर्भसामाजिक

बुलढाणा लोकसभा परिवर्तन सभे निमित्य संग्रामपूर येथे महिला मेळावा संपन्न.. वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून महिलांच्या विकासाचा संकल्प.. वन मिशन महिला मेळाव्याला महिलांचा मोठा प्रतिसाद. मेळाव्याला संबोधित करताना महिलांना आले गहिवरून..

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा

उत्कृष्ट नियोजन आणि विकासात्मक दृष्टिकोनासाठी ओळखले जाणारे’वन बुलढाणा मिशन’चे संकल्प संदीप शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली संग्रामपूर शहरातून निघालेली परिवर्तन रथयात्रा २२ फेब्रुवारीपासून संग्रामपूर तालुक्यात विकासाचा घोष अन परिवर्तनाचा जागर करणार आहे. या चार दिवसांत तब्बल ७० गावांमध्ये ही परिवर्तन रथयात्रा पोहोचत आहे… जनतेची संवाद साधून संदीप शेळके या आदिवासी भागातील महिलांच्या समस्या जाणून घेत असतांना त्यांच्या समस्येबद्दल बोलत असताना कित्येक महिलांच्या भावना ह्या भारावून व गहिवरून आल्याचे चित्र संग्रामपूर येथील महिला मेळाव्यात दिसून आले आहे.
संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यातील 22 जुलैला झालेल्या अतिवृष्टीच्या वेळी सर्वात आधी संदीप शेळके पूरग्रस्त गावात पोहोचले होते. त्यांनी पूरग्रस्तांना जीवना आवश्यक वस्तूंची मदत वस्तूंची व इतर साहित्य सुद्धा वाटप केले होते… वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक गावात पोहोचवण्याचा संदीप शेळके यांचा निर्धार असून आगामी लोकसभेच्या निवडणूक निमित्ताने त्यांची जोरदार तयारी सुरू केली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button