बुलढाणामलकापूरमहाराष्ट्रराजकीयविदर्भ

ॲड. स्नेहल तायडे यांची मलकापूर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती

मलकापूर प्रतिनिधी, : आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्र राज्य कमिटीने ॲड. स्नेहल तायडे यांची मलकापूर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. या नियुक्तीचे पत्र बुलढाणा जिल्हा संयोजक विष्णू यादव दांडगे यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले.

पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्यासाठी तालुका व शहर समित्यांची स्थापना करून गावागावात पक्षाच्या शाखा स्थापन करण्याचे निर्देश नियुक्तीपत्रातून देण्यात आले आहेत. पक्षाच्या ध्येयधोरणानुसार कार्य करत संघटना मजबूत करण्याची जबाबदारी ॲड. तायडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

ॲड. स्नेहल तायडे यांच्या नियुक्तीबद्दल आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून व पदाधिकाऱ्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली मलकापूर तालुक्यात पक्ष संघटनेला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button