आदिवासी एकता मंच महाराष्ट्र राज्य(तडवी भिल्लांची एकमेव रजिस्टर संघटना

आदिवासी तडवी-भिल समाजाच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाकडे निवेदन
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस रावेर ता प्रतिनिधी विकास आमोदकर
*यावल : आदिवासी तडवी भिल एकता मंचच्या वतीने आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित समस्या घेऊन राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे मा.अध्यक्ष अंतरसिंह आर्य साहेब यांची त्यांच्या सेंधवा येथे राहत्या घरी भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा करून निवेदन सादर करण्यात आले.
*निवेदनात अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वनहक्क कायदा 2006 व नियम 2008 तसेच सुधारित नियम 2012 अंतर्गत प्रलंबित दावे लवकरात लवकर निकाली काढावेत, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.*
तसेच शबरी घरकुल योजना पुन्हा सुरू करून पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ द्यावा, न्यूक्लिअस बजेट योजनेंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांची मदत वाढवावी, तसेच लाभार्थी हिस्सा माफ करून अधिक आर्थिक मदत द्यावी,
शबरी वित्त व विकास महामंडळामार्फत कर्ज योजनांमध्ये 35 टक्के सबसिडी देण्यात यावी, अनुसूचित जमातीचे जात पडताळणी कार्यालय धुळे येथे कायमस्वरूपी ठेवावे, तसेच नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना दिला जाणारा कोटा रद्द करून सर्व शासकीय आश्रमशाळांमध्ये इंग्रजी माध्यम सुरू करावे, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावल तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गाडऱ्या, जामन्या, उसमळी व लंगडाआंबा येथे रस्ते करून द्यावेत, तसेच यावल तालुक्यातील नायगाव, सावखेडा सिम, वड्री, डोंगर कठोरा आणि रावेर तालुक्यातील कळमोदा व चोपडा तालुक्यातील वरगव्हाण या गावांला पेसा गाव घोषित करावे
या शिवाय अनुसूचित जनजाती आयोगाच्या महाराष्ट्र समितीवर यावल तालुक्यातील एका सदस्याची नियुक्ती करावी अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
आदिवासी तडवी भिल्ल एकता मंच ने या मागण्यांची तातडीने दखल घेऊन संबंधित प्रश्न मार्गी लावावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे
याप्रसंगी आदिवासी एकता मंच चे जिल्हा संघटक रब्बील भाऊ तडवी मराठवाडा विभाग प्रमुख युनुस भाऊ तडवी यावल येथील युवा पदाधिकारी अकिल भाऊ तडवी,फुलसिंग बारेला उपसरपंच गाड्रया तसेच काशीराम बारेला ग्रा. पं. सदस्य गाड्रया उपस्थीत होते



