बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

गोहत्या बंदी आणि गोवंश संरक्षणासाठी देऊळगाव राजातील शिवभक्त सरसावले; कावड यात्रेत घेतला ‘गोमाता रक्षणाचा’ महासंकल्प!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा येथे गोमाता संरक्षणाचा शिवभक्तांनी घेतला दृढ संकल्प; कावड यात्रा समितीचा विशेष पुढाकार

देऊळगाव राजा:स्थानिक सकल हिंदू समाज आणि कावड यात्रा समितीच्या वतीने देऊळगाव राजा येथे भगवान महादेवाच्या साक्षीने गोमाता संरक्षणाचा एक विशेष आणि ऐतिहासिक संकल्प करण्यात आला.

श्रावण महिन्याचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात गोवंश रक्षणासाठी संपूर्ण हिंदू समाज एकवटल्याचे पाहायला मिळाले.देशात गोहत्या पूर्णपणे थांबावी, गोवंशाचे योग्य संरक्षण व संवर्धन व्हावे आणि समाजामध्ये गोसेवेची भावना अधिक दृढ व्हावी, हा या संकल्पामागील मुख्य उद्देश आहे.

‘गोमाता ही आपल्या संस्कृतीचा मुख्य आधार आहे, तिचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे,’ अशी भावना या प्रसंगी व्यक्त करण्यात आली. भगवान शिवशंकराच्या चरणी जलाभिषेक केल्यानंतर सर्व शिवभक्तांनी एकत्र येत गोमाता संरक्षणासाठी कटिबद्ध राहण्याची शपथ घेतली.

या विशेष प्रसंगी देऊळगाव राजा परिसरातील सर्व शिवभक्त, कावड यात्रा समितीचे पदाधिकारी आणि सकल हिंदू समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपूर्ण परिसर ‘हर हर महादेव’ आणि ‘गोमाता की जय’ च्या घोषणांनी दुमदुमून गेला होता.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button