तेल्हारा तालुक्यातील माळेगाव बाजार येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचे जल्लोषात उद्घाटन!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी
माळेगांव बाजार दि.१८ :
तेल्हारा शहरातील काहि तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला प्रथम पसंती दाखवत मागील आठवड्यात
मनसेत प्रवेश केला मागील पंधरवड्यात नुकतीच तालुका अध्यक्षाची नियुक्ति करण्यात असुन तेल्हारा तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक मोठी ताकद उभी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे या पाठोपाठ रविवार दि.१७ डिसेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तालुक्यातील माळेगांव बाजार येथे शाखेचे मोठ्या थाटात व जल्लोषात उद्घाटन करण्यात आले.
२०२४ च्या निवडणुकांचा काळ अगदी उंबरठया पर्यंत येऊन टेकलाय या द्रुष्टीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वत्र कंबर कसणे सुरू केले आहे असे चित्र दिसत आहे तेल्हारा तालुक्यातील माळेगांव बाजार येथील प्रथम शाखेचे जल्लोषात उद्घाटन करण्यात आले असून या शाखेमध्ये बहुसंख्य युवकांनी प्रवेश करुन आपली नवि ओळख निर्माण केली आहे . तेल्हारा तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्ष बळकटीसाठी सदस्य संख्या वाढवण्याच्या दृष्टिकोनातून पाऊलं उचलने सुरू केले आहे असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माळेगाव बाजार येथील शाखा नियुक्ती मध्ये शाखा प्रमुख पदी जगदिश इंगळे, उप शाखा प्रमुख शैलेश घोगले, शाखा अध्यक्ष अजय तायडे , शाखा सचिव मंगेश व्यवहारे यांची नियुक्ती करण्यात आली. विठ्ठल भाऊ लोखंडकार महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य उपाध्यक्ष यांच्या आदेशाने व अकोला जिल्हा अध्यक्ष राजूभाऊ काळे, महिला जिल्हा अध्यक्ष प्रशंसा ताई अंभोरे, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वरभाऊ कराळे , जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रेम पाटील , यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनियुक्त तालुका अध्यक्ष प्रदीप भाऊ राजूसकर तसेच तेल्हारा शहर अध्यक्ष श्याम भाऊ माहोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
शहर उपाध्यक्ष दिलीप भाऊ गावंडे, माजी शहर अध्यक्ष मनीष गवळी,सागर तायडे ,वैभव तायडे ,अक्षय इंगळे ,प्रशात इंगळे, राहुल इंगळे, मयुर म्हसाळ, प्रफुल आमले , सुमित व्यवहारे सह माळेगाव बाजार येथील तसेच तेल्हारा शहरातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते.



