रक्षाबंधनानिमित्त बहिणीला दिली झाडाची ओवाळणी. प्रशांत चव्हाण यांचा अनोखा पर्यावरणपूरक उपक्रम,

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी -प्रशांत चव्हाण
बुलढाणा : (दि.28 ऑगस्ट) रक्षाबंधन म्हटलं की बहिण भावाला औक्षण करते, भाऊ बहिणीला ओवाळणी म्हणून पैसे, साडी किंवा एखादी भेटवस्तू देतो. मात्र यंदा रक्षाबंधनानिमित्त पत्रकार प्रशांत चव्हाण यांनी पारंपरिक भेटवस्तूला फाटा देत आपल्या बहिणीला चक्क झाडाची ओवाळणी देत पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश दिला.
यावेळी प्रशांत चव्हाण यांनी बहिणीला झाड देताना, या झाडाची लागवड कर, त्याची नियमित देखभाल कर आणि त्याला मोठं कर. हे झाड सदैव माझ्या रक्षाबंधनाची आठवण तुला करून देईल,असा भावनिक संदेश दिला.
भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा सण पर्यावरण संवर्धनाशी जोडण्याचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे. पैसे किंवा महागड्या वस्तू भेट देण्यापेक्षा एखादे झाड भेट देऊन त्याचे संगोपन करण्याची संस्कृती निर्माण झाली, तर पर्यावरण रक्षणाला मोठी मदत होऊ शकते.
वृक्षतोड थांबविण्याची गरज
आज वाढते शहरीकरण, रस्ते व इमारतींचे बांधकाम आणि विविध विकासकामांमुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. त्यामुळे तापमानवाढ, पावसाचे बदलते प्रमाण, मातीची धूप आणि पर्यावरणाचा असमतोल यांसारख्या समस्या गंभीर होत आहेत.
एक झाड तोडण्यापूर्वी दहा वेळा विचार करा आणि शक्य तिथे एक झाड तोडले तर त्याच्या बदल्यात अनेक झाडे लावा, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. केवळ वृक्षारोपण करून थांबण्यापेक्षा लावलेल्या झाडाची नियमित देखभाल करून ते जगविणे हीच खरी पर्यावरणसेवा आहे.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहिणीला दिलेले हे झाड भविष्यात मोठे होऊन सावली, प्राणवायू आणि पर्यावरणाला हातभार लावेल. त्यामुळे “भाऊ-बहिणीचे नाते जपा आणि त्यासोबत निसर्गाशी असलेले नातेही जपा,” असा संदेश प्रशांत चव्हाण यांनी दिला.
आपलाच …. श्री.प्रशांत रंगनाथ चव्हाण. रा.भालगाव ता.चिखली जि.बुलढाणा मो.9673686570



