खिरोडा ते बोडखा भव्य कावड यात्रा उत्साह वातावरणात संपन्न.बजरंग दलाचा उपक्रम.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
संग्रामपूर प्रतिनिधी
संगीता उमाळे.
दि.२५/८/२०२६.
बोडखा; संग्रामपूर तालुक्यातील बोडखा गावामध्ये श्रावण मासानिमित्त बजरंग दलाच्या वतीने खिरोडा ते बोडखा साठी भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. हर हर महादेव. बम बम भोले आणि जय महाकाल जय घोषात हजारो शिवभक्त या कावड यात्रेत सहभागी झाले होते. खिरोडा येथील पूर्णा नदीची पवित्र जल घेऊन सकाळी महापूजा आणि जलाभिषेक करून या कावडला खांद्यावर घेऊन. कावळ यात्रेला सुरुवात करण्यात आली. भाविकांनी अत्यंत श्रद्धेने आणि शिस्तीने पवित्र जल कावडीत घेऊन. बोडखेतील महादेव मंदिर व इतर प्रमुख मंदिराकडे प्रस्थान केले.
भक्तिमय वातावरण भाविकांनी शिवगर्जना. हातात भगवे झेंडे घेऊन संपूर्ण मार्ग दुम दुमदुमून टाकला. यात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी स्थानिक नागरिकांनी कावडीवर पुष्प उधळून त्यांचे स्वागत केले. तसेच त्यांच्या फराळ व पिण्याच्या पाण्याची सोय सुद्धा केली होती.
बजरंग दल मंडळाच्या सेवकांनी वाहतूक व्यवस्था व भाविकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष नियोजन केले होते. या सोहळ्यामुळे संपूर्ण मार्गावर भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
या कावड यात्रेला भेट देण्याकरिता अमोल अंधारे शिवसेना जिल्हाध्यक्ष बजरंग दल. जिल्हाध्यक्ष सुशील कोल्हे. शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष गजानन धोरण तसेच इतर पदाधिकारी गावकरी मंडळ आणि गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कावड यात्रेचे पूजन हिंदू परिषद प्रखंड अध्यक्ष भीमाशंकर कातव यांच्या हस्ते करण्यात आले .



