महाराष्ट्र

श्री क्षेत्र वझेगाव येथे श्रींचा जन्मोत्सव सोहळा व यात्रा महोत्सव

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव : येथून जवळच असलेल्या परमहंस श्री रामचंद्र महाराज संस्थान श्री क्षेत्र वझेगाव येथे आज श्रींचा जन्मोत्सव सोहळा व भव्ययात्रा महोत्सव तसेच अखंड हरिनाम सप्ताह व संगीतमय श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ आयोजित करण्यात आला आहे.

या धार्मिक कार्यक्रमांचे हे ७७ वे वर्ष असून श्रीराम नवमीचे हनुमान जयंती पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम पार पाहत आहेत. श्रीराम नवमीला श्रींचा जन्मोत्सव पाळणा व आरती दुपारी बारा वाजता होईल यावेळी श्री संत वनवासी महाराज राजस्थान जयपुर यांची उपस्थिती राहणार आहे. दैनंदिन कार्यक्रमांमध्ये सकाळी ५ ते ६ काकडा, ९ ते १२ श्रीमद् व दुपारी ३ ते ५ श्रीमद् भागवत कथा, संध्याकाळी ६ ते ७ हरिपाठ व रात्री ८.३० ते १०.३० हरिकीर्तन राहील. यामध्ये अनुक्रमे ह भ प भानदास

महाराज टाकळी तालुका बाळापूर, ह.भ. प. गोपाल महाराज गारमोडे लासुरा तालुका मलकापूर, ह. भ. प. नागेश महाराज बोरखेड तालुका संग्रामपूर, ह. भ. प.

अनिल महाराज बोदडे वसाडी तालुका नांदुरा, ह. भ. प. रमेश महाराज दुधे पाळोदी जिल्हा यवतमाळ, ह.भ. प. निवृत्ती महाराज माळी श्री क्षेत्र वझेगाव त्र्यंबकेश्वर, ह.भ.प. श्री गुरुवर्य तुकाराम महाराज सखारामपुरकर यांचे काल्याचे किर्तन राहील. श्रीराम नवमीचे हनुमान जयंती पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह व संगीतमय भागवत कथेचे प्रवक्ते ह. भ. प. भागवताचार्य श्री केशव

जिल्हा अकोला यांच्या अमृततुल्य वाणीतून क होणार आहे. १० एप्रिल रोजी भव्य नेत्र तपासणी व औषधोपचार शिबिर आयोजित करण्यात आले असून यावेळी खासदार अनुप धोत्रे उ‌द्घाटक तर डॉक्टर आरती कुलवाल डॉ. तुरुंग तुषार वारे, डॉ. उद्धवरावजी गावंडे, डॉ. जनार्दन वानखडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. ८ एप्रिलला राजेश भास्करराव पाटील यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी पूजा तर १२ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता आमदार नितीन बापू देशमुख यांच्या शुभहस्ते श्रीच्या रथाची पूजन होणार आहे यावेळी बबलूभाऊ देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहील. तसेच हनुमान जयंतीला दुपारी १२ वाजता श्रीची रथातून प्रतिमा व पादुका पालखीसह टाळ मृदुंगाच्या गजरात गावातून भव्य मिरवणूक राहील तरी जास्तीत जास्त दिंड्यांनी उत्साहात सहभागी होण्याचे आवाहन संस्थानकडून करण्यात आले आहे। तात

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button