श्रीराम वानखेडे विद्यालय येथे अन्न सुरक्षितता विषयक महत्त्वपूर्ण सभा संपन्न……!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
संग्रामपूर:- २५ ऑगस्ट २०२६
वरवट खंडेराव (पातुर्डा फाटा) दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी मा. अन्न सुरक्षा आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आदेशान्वये तसेच पंचायत समिती संग्रामपूरच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांच्या अन्न सुरक्षिततेबाबत जनजागृती व मार्गदर्शन करण्यासाठी आज श्रीराम वानखेडे विद्यालय, वरवट खंडेराव (पातुर्डा फाटा) येथे अत्यंत महत्त्वपूर्ण सभेचे आयोजन करण्यात आले.
ही सभा मा. श्री सारंग कुलकर्णी साहेब, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती संग्रामपूर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. यावेळी श्री सचिन वडाळ साहेब, विस्तार अधिकारी (शिक्षण), पंचायत समिती संग्रामपूर, श्री कुलदीप बुंदे, केंद्रप्रमुख वानखेड-वरवट बकाल, श्री अनंत वानखेडे, मुख्याध्यापक, श्रीराम वानखेडे विद्यालय, श्री अनिल धनभर, केंद्रप्रमुख एकलारा तसेच श्री सतीश खंडेराव, केंद्रप्रमुख कवठळ यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्रीराम वानखेडे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अनंत वानखेडे यांनी मा. श्री सारंग कुलकर्णी साहेब व मंचावरील सर्व मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत केले. यावेळी श्री संदीप रहाटे, MDM DEO यांनी अन्न सुरक्षा व प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेबाबत सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या आहाराच्या सुरक्षिततेसंदर्भात आवश्यक त्या बाबी स्पष्ट करून उपस्थित मुख्याध्यापकांच्या विविध शंकांचे निरसन केले. तसेच मा. श्री सारंग कुलकर्णी साहेब यांनी प्रशासकीय विषयांचा सर्वंकष आढावा घेत अन्नसुरक्षा, विद्यार्थी सुरक्षा व शाळांची जबाबदारी याविषयी अत्यंत सखोल व मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षितता ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून, प्रत्येक शाळेने अन्नसुरक्षेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे त्यांनी यावेळी सांगितले. या महत्त्वपूर्ण सभेस एकलारा, कवठळ, पातुर्डा, वरवट खंडेराव, वरवट बकाल व वानखेड या केंद्रांतील सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित व निरोगी भविष्यासाठी आयोजित करण्यात आलेली ही सभा अत्यंत मार्गदर्शक व फलदायी ठरली.



