बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

तहसीलदारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा राष्ट्रवादीकडून निषेध

मकोका कायद्याअंतर्गत कारवाईची मागणी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगावराजा ; येथील तहसीलदार आणि अवैध रेती उत्खनन व वाहतूक प्रतिबंध पथक गस्तीवर असताना त्यांच्यावर रेती माफियांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निषेध करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ महसूल कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत काम बंद आंदोलनास पाठिंबा देत आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करून तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश इंगळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
राष्ट्रवादीने दिलेल्या पाठिंबा निवेदनात नमूद आहे की,शासकीय कर्तव्य बजावत असताना देऊळगावराजा येथील तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्यासह अवैध रेती उत्खनन व वाहतूक प्रतिबंध पथक यांच्यावर रेती माफियांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात येते आहे.सदर घटना अत्यंत संतापजनक असून यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांवर होणारे असे भ्याड हल्ले लोकशाहीला काळिमा फासणारे आहेत. या घटनेतील आरोपींवर तात्काळ आणि कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, ही प्रमुख मागणी आहे.तसेच, या घटनेच्या निषेधार्थ आणि न्यायासाठी महसूल कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत काम बंद आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा सक्रिय पाठिंबा आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुरक्षित वातावरण मिळणे अत्यंत गरजेचे आहे.त्यामुळे हल्लेखोर रेती माफियांना तात्काळ अटक व्हावी.आरोपींवर कठोर मकोका कायदा किंवा तत्सम कायद्यांतर्गत कारवाई व्हावी.अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश इंगळे व शिवाजी कोल्हे यांनी केली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button