बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

लिंगायत समाजाचा ‘अमृत’ संस्थेच्या अधिकृत लक्षित गटात समावेश; विविध योजना अन् उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा : शासनाच्या आदेशानुसार २० ऑगस्ट २०२६ पासून हिंदू लिंगायत व वीरशैव लिंगायत समाजाचा ‘महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी’ (अमृत), पुणे यांच्या अधिकृत लक्षित गटात समावेश करण्यात आला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे लिंगायत समाजातील पात्र युवक-युवती, महिला, व्यावसायिक व नवउद्योजकांसाठी रोजगाराच्या व विकासाच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

या निर्णयांतर्गत लिंगायत समाजातील पात्र लाभार्थ्यांना ‘अमृत’ संस्थेमार्फत वैयक्तिक व्यवसाय कर्ज व व्याज परतावा योजना,
उद्योजकता विकास कार्यक्रम (EDP),विविध कौशल्य विकास व रोजगाराभिमुख प्रशिक्षण, महिला बचत गट व सूक्ष्म वित्तीय उपक्रम
बाजारपेठ, व्यवसाय व विक्रीसाठी विशेष उपक्रम, शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन, युवक-युवतींसाठी स्वयंरोजगार व उद्योजकतेच्या संधी अशा विविध प्रशिक्षण योजनांमध्ये विद्यार्थ्यांचा व युवकांचा समावेश होत असून या योजना व उपक्रमांचा लाभ घेता येणार आहे:

पात्रता व अटी: या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. तसेच शासनाने निश्चित केलेल्या आर्थिक निकषांची पूर्तता करणे अनिवार्य राहील. इतर मागासवर्गीय (OBC) किंवा इतर महामंडळांच्या योजनांचा लाभ घेत नसलेल्या पात्र व्यक्तींनाच या योजनेचा लाभ घेता येईल.

शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकतेला चालना देऊन समाजातील घटकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे लिंगायत समाजातील पात्र इच्छुकांनी या संधीचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन अमृतचे जिल्हा व्यवस्थापक जिग्नेश कमाणी यांनी केले आहे.

अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी जिल्हा व्यवस्थापक जिग्नेश कमाणी यांच्या ९११२२२७६३७ किंवा ८३०८९९८९२२ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच ‘अमृत’ जिल्हा कार्यालय, फ्लॅट नंबर ३०५, तिसरा मजला, बुलढाणा प्राइड बिल्डिंग, तहसील कार्यालया समोर, बुलढाणा (४४३००१) येथे थेट संपर्क साधता येईल.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button