बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

देऊळगाव राजा येथील सामाजिक कार्यकर्ते दादा जम्मन व्यवहारे यांच्या भगिनी सरस्वती मसुरे यांचे मरणोत्तर नेत्रदान; समाजोपयोगी निर्णयाचे सर्वत्र कौतुक

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा:येथील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा सामाजिक कार्यकर्ते दादा जम्मन व्यवहारे यांच्या भगिनी सरस्वती सोपानराव मसुरे (वय ७०, रा. जालना) यांचे १३ ऑगस्ट रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. या दुःखद प्रसंगातही त्यांच्या परिवाराने सामाजिक भान जपत सरस्वती मसुरे यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्याचा एक आदर्श आणि कौतुकास्पद निर्णय घेतला.

सरस्वती मसुरे यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र राम मसुरे आणि श्याम मसुरे यांनी आईच्या स्मृती प्रिट्यर्थ मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प केला. त्यांनी तातडीने जायंट्स परिवाराचे पदाधिकारी डॉक्टर अशोक काबरा आणि जुगल किशोर हरकुट यांच्याशी संपर्क साधून याविषयी माहिती दिली.

डॉ. काबरा आणि जुगल किशोर हरकुट यांनी तत्परता दाखवत जालना येथील प्रसिद्ध गणपती नेत्रालयाच्या वैद्यकीय चमूला पाचारण केले. गणपती नेत्रालयाच्या डॉक्टरांच्या पथकाने तातडीने पोहोचून सर्व कायदेशीर व वैद्यकीय सोपस्कार पार पाडत नेत्रदानाची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. मसुरे परिवाराच्या या धाडसी आणि संवेदनशील निर्णयामुळे दोन अंध व्यक्तींच्या आयुष्यातील अंधार दूर होऊन त्यांना नवीन दृष्टी मिळण्यास मदत होणार आहे.

मृत्यू पश्चात सरस्वती मसुरे यांच्या मागे दोन मुले आणि दोन मुली असा मोठा आप्तपरिवार आहे. दुःखद प्रसंगातही अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा हा सामाजिक संदेश दिल्याबद्दल मसुरे आणि व्यवहारे परिवाराचे देऊळगाव राजा आणि जालना परिसरात सर्वत्र कौतुक व कौतुकास्पद चर्चा होत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button