शहरातील वाहतूकिच्या कोंडीने जनता हैराण;

पोलिस प्रशासन व नगर पंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगांव : – शहरात अनेक वर्षापासून वाहतूक कोंडीची समस्या आ वासून उभी आहे या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजनाच होत नसल्याने ही समस्या आता आणखी बिकट झाली आहे तेव्हा पोलिस प्रशासन आणि नगर पंचायत प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन ही समस्या कायम स्वरुपी निकाली काढावी अशी रास्त मागणी जनतेतून केली आहे दररोज शहरात महत्वाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करून ही समस्या त्वरित सोडवावी अशी मागणी शहरासह तालुक्याती जनतेतुन सोशल मीडिया द्वारे सातत्याने केली जात आहे शहरातील शाळा महाविद्यालये सुरु होऊन जवळपास दोन महिने झाले आहेत शाळांतील विद्यार्थी व या विदयार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी व शाळा सूटल्यानंतर त्यांना घरी नेण्यासाठी पालक वर्ग तसेच खासगी वाहनधारक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात या टू व्हीलर,व फोर व्हीलर वाहनांमुळे शहरातील मुख्य रस्त्यावरच वेडी,वाकडी कशीही बेशिस्त वाहने रहदारीला अडथळा निर्माण करतात शिवाय ग्रामीण भागातून सणासुदीच्या काळात बाजारासाठी येणाऱ्या नागरिकांचीही संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे प्रत्येकजण शहरात टू व्हीलर,फोर व्हीलर घेऊन येत आहेत शिवाय याची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे शहरात पार्किंगची पाहिजे तशी योग्य सुविधा नाही जागा नसल्याने याचे दुष्परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होत आहेत जिथे ५ मिनिटात पोहोचायला लागतात तिथे १५ ते २० मिनिटे जास्तीचा वेळ लागत आहे पार्किंगसाठी योग्य नियोजन नसल्याने वाहतूक कोंडी होत आहे शिवाय अनेक दुकाने,टपरी यांचे सामान रस्त्यावर येत आहे दुकानदार दुकानातील माल अर्ध्या रस्त्यावर आणून ठेवतात त्यामुळे रस्ता त सामानाने भरून अरुंद होतो शिवाय शहरातील सर्वच रस्त्यावर भाजीपाला,व फळ विक्रेते,विविध वस्तु विक्रेते,हातगाडीवाले यांनी बेकायदेशीर अतिक्रमण केल्याने मालेगांव मधील नागरिकांना मोकळा श्वास घेणेकठीण जात आहे अनेक ठिकाणी रस्त्यांचे रुंदीकरण झालेले नाही त्यामूळेही वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढत आहे मालेगांवातील रस्त्यावरील वाहनांच्या नियोजनासाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली नाही त्यामुळे वाहन चालक या नियमांचे पालन करताना दिसून येत नाहीत नियमबाह्यपणे वाहने पार्किंग करणाऱ्यांवर तसेच रस्त्यावर वेडी वाकडी वाहने लावणाऱ्यांवर मालेगांव नगर पंचायत किंवा पोलीस प्रशासनाच्या वाहतूक विभागाच्या वतीने कोणतीही कायदेशीर कारवाई होत नसल्याने अवैध व बेकायदेशीर पार्किंगला व वाहतूक कोंडीला प्रोत्साहन मिळत आहे ही समस्या सुटत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण पसरले आहे
प्रशासनाने या सर्व समस्या लक्षात घेऊन मालेगांव शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दूर करावी अशी मागणी मालेगांव शहर व तालुक्यातील जनतेतुन केली जात आहे,ह्या समस्या सुटत नसल्याने यावेळी शहरातील नागरिक मालेगांव येथील तहसील कार्यालय व नगरपंचायत कार्यालय व तसेच पोलीस स्टेशन येथे पत्रव्यवहारद्वारे निवेदन देनार आहेत,
बॉक्स
मालेगांव शहरातील वाहतूक कोंडीची ठिकाणे- जोगदंड हॉस्पिटल ते गांधी चौक,शिवचौक,नगरपंचाय कार्यालय समोरून ते लहुजी वस्ताद पुतळ्या पर्यंत,अग्निहोत्री पेयर ची एजेन्सी ते मेडिकल चौक,डॉक्टर विवेक माने यांच्या हॉस्पिटल पर्यंत,अग्रवाल क्लॉथ स्टोअर ते आठवडी बाजार,तहसील कार्यालय पर्यंत,दुर्गा चौक ते सोनार गल्ली डॉ.चव्हान यांचे हॉस्पीटलपर्यंत,हे मुख्य प्रमुख रस्त्याची समस्या दूर करणे अति महत्त्वाचे आहे तसेच हा रोड खूप महत्त्वाचा आहे या रोडने प्रायव्हेट हॉस्पिटल आहे ग्रामीण भागातून ॲम्बुलन्स ने पेशंट आणतात मालेगाव शहरातून इमर्जन्सी पेशंन्टन हॉस्पिटल ला जायला अनेक वाहतुकीचे अडथळे निर्माण होतात त्यामुळे मधातच पेशंट दगावला तर याला जिम्मेदार कोण असा प्रश्न मालेगाव तालुका व शहरातून होत आहे.



