अपघातबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

मोंढ्याजवळ दोन भरधाव दुचाकींची धडक; एक जखमीनिष्काळजीपणे दुचाकी चालविणे बेतले जीवावर; देऊळगाव राजात अपघात प्रकरणी गुन्हा दाखल

मोंढ्याजवळ दोन भरधाव दुचाकींची धडक; एक जखमी
निष्काळजीपणे दुचाकी चालविणे बेतले जीवावर; देऊळगाव राजात अपघातप्रकरणी गुन्हा दाखल

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी : शंकर शिवरकर

देऊळगाव राजा : शहरातील मोंढ्याजवळ भरधाव आणि निष्काळजीपणे दुचाकी चालवून समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याची घटना ११ ऑगस्ट रोजी रात्री घडली. या अपघातात एका दुचाकीस्वारास दुखापत झाली असून, त्याचबरोबर धडक देणारा दुचाकीस्वारही जखमी झाला आहे. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी किरण बंडू शिंदे (रा. सातेफळ रोड, देऊळगाव राजा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनोहर कपूरचंद मारोठे (वय ५१, रा. सिव्हील कॉलनी, देऊळगाव राजा) यांचा भाऊ ११ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ८ वाजता मोटारसायकल क्रमांक एमएच २८ सीए ८४९४ वरून मिस्त्री कोटकर पेट्रोलपंपाच्या दिशेने घरी येत होता. तो मोंढ्याजवळील रस्त्यावर आला असता आरोपी किरण बंडू शिंदे हा त्याच्या ताब्यातील मोटारसायकल भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवत आला.

यावेळी शिंदे याने मारोठे यांच्या भावाच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात मारोठे यांच्या भावाला दुखापत झाली. तसेच धडक देणारा किरण शिंदे हादेखील जखमी झाला. घटनेनंतर याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात कायमी अप क्रमांक ३६९/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८१ आणि १२५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक यांच्या आदेशाने पोलीस हेडकॉन्स्टेबल भास्कर सानप (ब.नं. १८३६) यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन काकड (ब.नं. २०५०) यांनी केली.
दरम्यान, या अपघाताची नेमकी परिस्थिती, दोन्ही वाहनांचा वेग आणि अपघातास कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीबाबत पोलीस तपास सुरू आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button