मंठा येथे शिवसेना (उबाठा) ची पदवीधर नोंदणीसाठी मोर्चेबांधणीमराठवाडा समन्वयक दिलीपराव घुगे यांचे मार्गदर्शन; 100% नोंदणीचे उद्दिष्ट

जालना/मंठा, प्रतिनिधी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंठा तालुक्यात मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. ग्रामीण भागातील पदवीधर मतदारांची नाव नोंदणी वाढवण्यासाठी पक्षाच्या वतीने महत्वपूर्ण बैठक मंगळवारी मंठा येथे संपन्न झाली. बैठकीचे अध्यक्षस्थान मराठवाडा समन्वयक श्री. दिलीपराव घुगे यांनी भूषवले.
बैठकीत बोलताना घुगे म्हणाले की मंठा तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागात अजूनही अनेक पदवीधरांची नाव नोंदणी झालेली नाही. त्यामुळे ते मतदानापासून वंचित राहतात. तळागाळातील प्रत्येक पदवीधरापर्यंत पोहोचून त्यांची नाव नोंदणी करणे हे कार्यकर्त्यांसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. यासाठी दर महिन्याला आढावा घेऊन शंभर टक्के नाव नोंदणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
मराठवाड्यात शिवसेना (उबाठा) चे संघटन मजबूत आहे. पदवीधरांची नोंदणी व्यवस्थित झाली तर ही जागा आपण नक्की जिंकू शकतो, असा विश्वासही घुगे यांनी व्यक्त केला.
जिल्हा समन्वयक श्री. अनंतराव वैद्य यांनी परतुर, मंठा, घनसावंगी आणि अंबड या भागात शंभर टक्के पदवीधर नोंदणी पूर्ण करून शिवसेनेला आघाडी मिळवून देण्याचा निर्धार बोलून दाखवला.
बैठकीतील प्रमुख उपस्थिती
उपजिल्हाप्रमुख माधवराव मामा कदम, अशोकराव आघाव, तालुका संघटक ज्ञानेश्वर सरकटे, उपतालुकाप्रमुख संजय नागरे, देविदास खरात, युवासेना तालुका प्रमुख डिंगाबर बोराडे, आसाराम बोराडे, महादेवराव बाहेकर, अशोकराव पाईकराव, शिवाजीराव बोराडे, संजय राठोड, नारायण राठोड, राजेंद्र कोटेजा, गणेशराव जाधव, अशोकराव खंदारे, रज्जाक शेख, शिवाजी येवुल, गणेश नळगे, रामराव वैद्य, सुनील वैद्य, सदाशिव लाड, सुरेश चाटे, बाळासाहेब दराडे, राहुल राठोड, दिनकर राठोड, कैलासराव भिसे, शरद काकडे, मनोहर काकडे, राहुल काकडे, सुभाष पवार, विजय दवणे, हनुमान दवणे, संग्राम काकडे, बंडू राठोड, सर्जेराव कदम, उद्धवराव जाधव, दादाभाऊ ढवळे, रामदासराव जाधव, प्रभाकर बाहेकर, संतोष बाहेकर, भागवत बाहेकर, तुकाराम बोरकर, भारत वैद्य, बळीराम गव्हाणे, अमोल वैद्य, विजय वैद्य, बाबासाहेब वरकड, सुदर्शन देशमुख, सचिन खरात, दिलीप लांडे, भीमराव नागरे, सखाराम वायकर, विठ्ठल मुंढे, संभाजीराव घारे, दत्तराव चव्हाण, राम पवार, विलास पवार, संजय खरात, केशवराव बाहेकर, मधुकरराव देशमुख, गोविंद चव्हाण, नवनाथ नाईक, समाधान नाईकवाडे, प्रविण चव्हाण, भरत वैद्य, निलेश पंजरकर, शुभम मुदळकर, शिवप्रसाद शिंदे, बालाजी गायकवाड, आकाश शिंदे, कैलासराव वैद्य, जीवन वैद्य, सुभाष राऊत, उद्धवराव राऊत आदी पदाधिकारी, शिवसैनिक आणि पदवीधर मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. बाळासाहेब मोरे यांनी केले आणि आभार मानले.
पदवीधर नाव नोंदणीची मोहीम आता गावपातळीवर अधिक तीव्र करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.



