बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ उपशाखा संग्रामपूरतर्फे गटशिक्षणाधिकारी श्री सारंग कुलकर्णी साहेब यांचा भव्य स्वागत व सत्कार…..!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद

संग्रामपूर:- ७ ऑगस्ट २९२६
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ उपशाखा संग्रामपूरच्या वतीने मा गौतमराव मारोडे राज्यचिटणीस यांच्या निर्देशनानुसार नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी मा. श्री सारंग कुलकर्णी साहेब यांचा स्वागत व सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. नुकताच त्यांनी गटशिक्षणाधिकारी, संग्रामपूर या पदाचा पदभार स्वीकारल्याबद्दल संघटनेच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास श्री सचिन वडाळ (शिक्षण विस्तार अधिकारी), श्री कुलदीप बुंदे (केंद्रप्रमुख) आणि श्री अब्दुल्ला खान (केंद्रप्रमुख) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या परंपरेनुसार जिल्हा उपाध्यक्ष श्री सुधीर दाते, सल्लागार श्री मिलिंद सोनोने, तालुकाध्यक्ष श्री श्याम कौलकार, कार्याध्यक्ष श्री मनोहर खंडेराव, सरचिटणीस श्री अनिल धनभर, कोषाध्यक्ष श्री श्रीहरी सोळंके आणि कार्यालयीन चिटणीस श्री वसंत खंडारे यांच्या हस्ते मा. श्री सारंग कुलकर्णी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित श्री सचिन वडाळ (शिक्षण विस्तार अधिकारी, संग्रामपूर) यांचाही शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. श्री कुलदीप बुंदे (केंद्रप्रमुख), श्री अब्दुल्ला खान (केंद्रप्रमुख) यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
नव्याने शिक्षण विभागात रुजू झालेले आस्थापना लिपिक श्री सचिन घिवे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री अनिल धनभर यांनी केले. त्यांनी संघटनेची कार्यपद्धती, शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी संघटनेची असलेली बांधिलकी, तसेच शिक्षण विभागाशी समन्वय साधून शिक्षक हितासाठी सातत्याने केले जाणारे प्रयत्न याविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्री वसंत खंडारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री भास्कर डोसे यांनी केले.
या स्वागत व सत्कार समारंभास शिक्षण विभागातील सर्व आस्थापना व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ उपशाखा संग्रामपूरचे पदाधिकारी, शिक्षक व संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण, स्नेहपूर्ण आणि शिक्षक संघटनेच्या एकजुटीचे दर्शन घडविणारा ठरला…….✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button