डॉ.अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी : शंकर शिवरकर
देऊळगाव मही : डॉ. अण्णाभाऊ साठे हे कष्टकरी, कामगार आणि वंचित समाजाचे खरे नेतृत्व करणारे लोकशाहीर होते. आपल्या लेखणीतून त्यांनी अन्याय विषमता आणि शोषणाविरुद्ध आवाज उठवला त्यांच्या विचारांचा वारसा हा पुढील पिढीपर्यंत पोहचविणे ही काळाची गरज आहे.असे प्रतिपादन भाजपा युवानेते गणेश नागरे यांनी केले.या कार्यक्रमाला भाजपा नेते विनोद वाघ,
अंकुर देशपांडे, शिवाजी वाघ, प्रभाकर नागरे, कृष्णा शिंगणे दीपक जी रिंढे, अरुण कुटे,सुरेश कुटे,प्रमोद सानप, हरिभाऊ गोमटे,हरिभाऊ दहातोंडे, स्वप्निल काकड,सुनील पाटोळे,विनोद नागरे,समाधान डोईफोडे, दत्ताभाऊ आरमाळ, विनायक कायंदे,विठ्ठल गवते, कृष्णा गवते, पवन परिहार, गणेश जावळे, अनिल टाले, विट्टल कत्ते, नितीन जाधव,सुभाष बोर्डे, उमेश सोसे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.



