बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त शिवसेनेकडून अभिवादन

स्टार भारत लाईव्ह एकसप्रेस
चिखली तालुका: प्रतिनिधी
अरुणा दत्तात्रय खंडागळे

चिखली
लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त चिखली शहर शिवसेनेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी लोकशाहीर  अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक, सामाजिक आणि क्रांतिकारी कार्याला उजाळा देत त्यांच्या समता, सामाजिक न्याय व मानवतेच्या विचारांचा वारसा जपण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) ना. प्रतापराव जाधव यांचे बंधू तथा मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष माधवराव जाधव, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शिवाजी बापू देशमुख, तालुकाप्रमुख गजानन मोरे, शहरप्रमुख विलास घोलप, युवा सेना संपर्क प्रमुख अमोल ढोरे, शहर संघटक पंडित अण्णा जेठे, विष्णू मेथे, अभि वीर, सत्यशोधक अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय फाउंडेशनचे अध्यक्ष भाई छोटू कांबळे, जेष्ठ नेते अनिल कांबळे, योगेश गवई, साहेबराव अंभोरे, विकी निकाळजे, सौरभ बावस्कर, संदीप अंभोरे, दीपक अंभोरे, विशाल काकफळे,सत्यम कांबळे, महेश बोधेकर, पवन चिंचोले यांच्यासह शिवसैनिक व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना अभिवादन करत समाजातील वंचित, शोषित घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाच गौरव करण्यात आला. त्यांच्या विचारांवर चालत सामाजिक ऐक्य, समता आणि न्यायाची मूल्ये समाजात अधिक बळकट करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button