तेल्हाऱ्यातील वैभव काळे यांचा शोध सुरू; नागरिकांना सहकार्याचे आवाहनतेल्हारा,

तेल्हाऱ्यातील वैभव काळे यांचा शोध सुरू; नागरिकांना सहकार्याचे आवाहनतेल्हारा,
दि. ३ ऑगस्ट (प्रतिनिधी : विजय मनोहर घोडे) :
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा शहरातील तुळजाभवानी चौक परिसरात राहणारे गोलू उर्फ वैभव श्रीराम काळे (वय ३२) हे रविवारी (दि. २ ऑगस्ट) सकाळी सुमारे ८ वाजता घरातून कोणालाही न सांगता बाहेर पडले असून त्यानंतर ते घरी परतलेले नाहीत. दिवसभर नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी त्यांचा तेल्हारा शहरासह आजूबाजूच्या गावांमध्ये शोध घेतला; मात्र त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही.हरवलेल्या वैभव काळे यांचा बांधा सळपातळ असून रंग निमगोरा आहे. त्यांच्या डाव्या डोळ्याचा आकार बारीक आहे. ते घरातून निघताना अंगात आकाशी रंगाचा फुलबाह्यांचा शर्ट, काळ्या रंगाची पँट आणि पायात काळ्या रंगाची तारा कंपनीची चप्पल परिधान केली होती. त्यांची उंची अंदाजे ५ फूट ८ इंच आहे.दिवसभर शोध घेऊनही ते न सापडल्याने त्यांचे वडील श्रीराम काळे तसेच परिसरातील नागरिकांनी रविवारी रात्री सुमारे ११ वाजता तेल्हारा पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली आहे.दरम्यान, वरील वर्णनाची व्यक्ती कोणाला कुठेही आढळल्यास किंवा त्यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास त्यांच्या वडिलांशी ९६८९९९९४७० या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन नातेवाईकांनी केले आहे.



