खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

महापुरुषांच्या विचारांचा जागर; जे. ई. स्कूलमध्ये वक्तृत्व स्पर्धेसह टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

मुक्ताईनगर | प्रतिनिधी

मुक्ताईनगर येथील जे. ई. स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महापुरुषांच्या विचारांचा वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमास शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व्ही. एम. चौधरी, उपमुख्याध्यापिका व्ही. के. शिर्के, पर्यवेक्षक के. आर. कवळे, व्ही. डी. बऱ्हाटे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन श्रीमती एल. व्ही. पाटील, सौ. आर. बी. महाजन आणि आर. पी. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन श्रीमती एल. व्ही. पाटील यांनी केले.यावेळी आर. पी. पाटील यांनी लोकमान्य टिळक यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, राष्ट्रभक्ती, शिक्षणविषयक विचार आणि समाजजागृतीच्या कार्याचा आढावा घेतला. तर सौ. आर. बी. महाजन यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, समाजप्रबोधन आणि वंचित समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली.कार्यक्रमाच्या निमित्ताने इयत्ता पाचवी ते सातवी आणि इयत्ता आठवी ते दहावी अशा दोन गटांमध्ये वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या जीवनकार्यावर प्रभावी भाषणे सादर करत आपल्या वक्तृत्व कौशल्याची छाप पाडली.या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक समता, देशभक्ती आणि महापुरुषांच्या विचारांचे जतन करण्याची प्रेरणा निर्माण झाली. प्रेरणादायी वातावरणात कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button