खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्र

जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त जळगाव जिल्हा पोलिसांचा अभिनव उपक्रम

‘विश्वासाची लेन्स’ छायाचित्र स्पर्धेचे आयोजन; पत्रकारांना सहभागाचे आवाहन

जळगाव | प्रतिनिधी

जागतिक फोटोग्राफी दिन (१९ ऑगस्ट) निमित्त जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पत्रकारांसाठी “विश्वासाची लेन्स : पोलीस–पत्रकार–जनता सहकार्य छायाचित्र स्पर्धा” आयोजित करण्यात आली आहे. पोलीस, पत्रकार आणि समाज यांच्यातील विश्वास, सहकार्य व सकारात्मक संवाद अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.

छायाचित्र हे केवळ एक दृश्य नसून समाजातील वास्तव, भावना, संघर्ष, सेवा, कर्तव्य आणि प्रेरणेचे प्रभावी दस्तऐवजीकरण असते. पत्रकार आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून समाजातील महत्त्वाच्या घटनांना इतिहासात जतन करत असतात. त्यांच्या या योगदानाचा गौरव करण्यासह समाजाला सकारात्मक संदेश देणाऱ्या छायाचित्रांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेचा प्रमुख हेतू असल्याचे जिल्हा पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

स्पर्धेसाठी पोलिस इन पब्लिक सर्व्हिस, क्राईम, सोशल, ट्रॅफिक, जळगाव हेरिटेज, स्पोर्ट्स आणि वुमन एम्पॉवरमेंट अशा सात गटांमध्ये छायाचित्रे स्वीकारण्यात येणार आहेत.

स्पर्धेसाठी छायाचित्रे पाठविण्याची अंतिम तारीख १२ ऑगस्ट २०२६ असून, स्पर्धकांनी आपली छायाचित्रे व्हॉट्सअॅप क्रमांक ९७०२२ ००३१५ वर पाठवावीत. प्राप्त छायाचित्रांचे मोठ्या आकारात प्रदर्शन १५ ऑगस्ट रोजी पद्मालय हॉल, पोलीस मुख्यालय, जळगाव येथे आयोजित करण्यात येणार आहे.

प्रत्येक सातही गटांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय असे तीन पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून, पुरस्कार वितरण मान्यवर मंत्री यांच्या हस्ते होणार आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक, जळगाव यांनी जिल्ह्यातील सर्व पत्रकारांना या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले आहे. आपल्या छायाचित्रांमधून समाजातील सकारात्मकता, लोकसहभाग, सेवाभाव आणि पोलीस–जनता–पत्रकार यांच्यातील विश्वासाचे प्रभावी दर्शन घडवावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button