खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

अंतुर्लीत ‘खाकी’च्या सावलीत सट्ट्याचा उघडा बाजार!​पोलीस यंत्रणा ‘हप्ता’ वसुलीत मग्न;अवैध जुगाराने शेकडो कुटुंबे रस्त्यावर, ‘सिंघम’चा आव आणणाऱ्या प्रशासनाचे कायद्यालाच आव्हान!*

​मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली गावात सध्या कायदा अन् सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला असून, सट्टा आणि मटक्याचे अड्डे अक्षरशः ऐन मोक्याच्या ठिकाणी धुमाकूळ घालत आहेत. उघडउघड चालणाऱ्या या काळ्या धंद्यांकडे स्थानिक पोलीस प्रशासनाने जाणीवपूर्वक डोळेझाक चालवली असून, “पोलीस कायदे-नियम फक्त सामान्य जनतेवर दाखवण्यासाठीच आहेत का?” असा चीड आणणारा सवाल अंतुर्लीतील नागरिक विचारत आहेत.

​
​अंतुर्ली परिसरातील गल्लीबोळात आणि टपऱ्यांवर दिवस-रात्र जुगाराची चक्रे फिरत आहेत. कष्टकरी, शेतमजूर आणि तरुण पिढी या सट्ट्याच्या जाळ्यात ओढली जात आहे. रोजच्या कमाईचा पैसा जुगाराच्या टेबलवर उधळला जात असल्याने कित्येक कुटुंबांची चुली पेटणे कठीण झाले असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.

​
​या संपूर्ण प्रकारात सर्वात संतापजनक बाब म्हणजे, गावाला भेडसावणारा हा कॅन्सर स्थानिक पोलिसांना मात्र दिसत नाही!
​सर्वसामान्य नागरिकाने एखादी छोटीशी चूक केली, तर त्याला कायद्याचा धाक दाखवणारे पोलीस या सट्टामाफियांसमोर हतबल का होतात?

​अंतुर्लीतील ही पोलीस यंत्रणा गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी आहे की फक्त महिन्याचे ‘हप्ते’ गोळा करणारी ‘वसूली एजंट’ बनली आहे?
असा तिखट सवाल आता संतप्त ग्रामस्थ करत आहेत.

​स्थानिक पोलिसांचे हात ओले होत असल्यानेच या अवैध धंदेवाल्यांची मुजोरी गगनाला भिडल्याचा थेट आरोप होत आहे. स्थानिक पोलीस अधिकारी जर स्वतःचे कर्तव्य विसरून मूकप्रेक्षक बनले असतील, तर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वतः या प्रकरणात थेट हस्तक्षेप करावा. अंतुर्लीतील सट्ट्याचे अड्डे उखडून फेकावेत आणि हप्तेखोरीत गुंतलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची तत्काळ उचलबांगडी करावी, अशी वादळी मागणी आता अंतुर्लीतून जोर धरू लागली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button