खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्ररावेर
रावेरला शासकीय गोदाम कर्मचारी व गृहरक्षक दल कडून वृक्षारोपण

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
रावेर ता.प्रतिनिधी :-विकास आमोदकर
रावेर दि प्रतिनिधी येथील भारखेडा रस्त्यावरील शासकीय धान्य गोदाम परिसर येथे गोदाम कर्मचारी व गृह रक्षक दल यांच्या संयुक्त विद्यमाने वड आणी पिंपळ यासारखे दीर्घायुष्य असणारे वृक्ष लागवड करण्यात आली.
यावेळी परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी दीपा जेधे, पुरवठा निरीक्षक कु डाळिंबी सरोदे यांच्या हस्ते वृक्षारोपण शुभारंभ करण्यात आला तरी तर गोदाम व्यवस्थापक शंकर गावडे, गोदाम लिपिक धर्मेंद्र चौधरी, गोदाम व्यवस्थापक/ लिपिक सावदा हर्षल पाटील दीपक नगरे प्रकाश पाटील गृहरक्षक दलाचे तालुका समदेशक कांतीलाल तायडे हे उपस्थित होते
कर्मचारी फिरोझ खान स्वरूप महाजन गणेश पाटील विजय महाजन अब्दुल खान गोलू मोरे होमगार्ड
दिनेश महाजन यांनी परिश्रम घेतले



