बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

अमृतनगर प्रभाग क्र. ५ मध्ये SIR नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

बांधकाम सभापती विष्णू झोरे व व्हॉईस ऑफ मीडिया तालुका उपाध्यक्ष विजय जाधव यांच्या पुढाकाराने आयोजन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी; शंकर शिवरकर

देऊळगाव राजा शहरातील अमृतनगर प्रभाग क्रमांक ५ येथे नगर परिषद बांधकाम सभापती विष्णू झोरे तसेच व्हॉईस ऑफ मीडिया तालुका उपाध्यक्ष विजय जाधव यांच्या पुढाकाराने SIR नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबिरात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत SIR नोंदणी करून घेतली. नोंदणी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी BLO अनिल बुरकुल, BLO राजेंद्र पंजरकर, BLO शेख मसूद आणि BLO अब्दुल मसूद यांनी नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली.
या शिबिराला पत्रकार राहुल नायर, सागर सवडे, कृष्णा सोनवणे, अहमद खान यांच्यासह इतर मान्यवर नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत नागरिकांनी वेळेत SIR नोंदणी करून लोकशाही प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.
यावेळी विष्णू झोरे व विजय जाधव यांनी नागरिकांना शासनाच्या सूचनांनुसार वेळेत SIR नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन केले. शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button