पोलीस स्टेशन अमडापुर यांची अवैध हातभट्टी दारु वर धडक कारवाई

स्टार भारत लाईव्ह एकसप्रेस
चिखली : प्रतिनिधी
आज दिनांक 09/07/2026 रोजी डोंगरशेवली शिवार येथील दरी खोऱ्यात जंगलामध्ये अवैध हातभट्टी दारू गाळण्याचे काम सुरू असले गोपनीय माहिती मिळाल्यावर ठाणेदार अमडापूर, जयसिंग राजपूत सोबत स्टाफ सह धाड टाकून अवैध हातभट्टी दारू नष्ट करून धडाकेबाज कार्यवाही करण्यात आलेली आहे. सदरची कार्यवाही रेखाबाई सुनील पवार व मंगलाबाई गणेश पवार राहणार डोंगरखंडाळा तालुका चिखली त्यांच्याविरुद्ध करण्यात आली आहे.
सदर कारवाई दरम्यान आरोपी रेखाबाई सुनील पवार यांच्याकडून 14 लिटर हातभट्टी दारू किंमत अंदाजे सहाशे रुपये व इतर मुद्देमाल 3430 रुपये व आरोपी मंगलाबाई गणेश पवार तिचे ताब्यातून 14 लिटर हातभट्टी दारू किंमत अंदाजे सातशे रुपये व इतर मुद्देमाल 3650 रुपये जप्त करण्यात आला असून हातभट्टी दारू व सडावा नाश करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही अमडापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार जयसिंग राजपूत सोबत ASI निवृत्ती चेके, पोलीस हवालदार बिलगे, पो.शि. चंद्रशेखर मुरडकर, पो.शि. दुर्गासिंग ठाकूर, पो.शि. रंजीत सरोदे, चालक चिंचोले, महिला अंमलदार वैशाली आराख अशांनी कामगिरी बजावली आहे..
वरील महिला आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन अमडापूर येथे दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास बीट अंमलदार ASI निवृत्ती चेके करीत आहेत.✍️



