बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

सवणा जि.प. उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेत भरारी; हुमेरा बी शेख लुकमान जिल्ह्यात प्रथम!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
चिखली प्रतिनिधी:- सलमान पठाण

तालुका चिखली,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत चिखली तालुक्यातील सवणा येथील जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेच्या एकूण ११ विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवत शाळेचा, शिक्षकांचा आणि गावाचा नावलौकिक उंचावला आहे.
या यशातील सर्वात अभिमानाची बाब म्हणजे इयत्ता ५ वीची विद्यार्थिनी हुमेरा बी शेख लुकमान हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तसेच चिखली तालुका गुणवत्ता यादीतील पहिल्या १० क्रमांकांमध्ये शाळेचे ६ विद्यार्थी स्थान मिळवून शाळेची शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे.
जिल्हा गुणवत्ता यादीतील गुणवंत विद्यार्थी
हुमेरा बी शेख लुकमान (जिल्ह्यात प्रथम)
मुजाहिद खान सलीम खान
महेर बी शेख मुख्तार
सायमा फिरोज खान
आलिया हुमेरा फिरोज खान
शाजिया समरीन शेख बब्बू
अमान खान शब्बीर खान
फिजा शेख अयाज
सुहाना इमरान शाह
आदीबा नाज शेख असलम
आलिया बी शेख मुख्तार
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पालक आणि सवणा ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांचे सहकार्य यामुळेच हा यशाचा मानाचा टप्पा गाठता आल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button