जळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

पीडित मायलेकीची केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी घेतली भेट

स्टार भारत लाईव्ह एकसप्रेस
चिखली:तालुखा: प्रतिनिधी

घटनेचा केला तीव्र निषेध ; “दोषींना कोणतीही माफी नाही, सखोल चौकशी करून कठोर कारवाई करा” – पोलिसांना निर्देश

चिखली :-
शेतजमिनीच्या वादातून अमानुष मारहाण झालेल्या शेलगाव जहांगीर येथील पीडित उषाबाई साळवे व कु.  प्रतीक्षा साळवे यांची केंद्रीय आयुष मंत्री तथा बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार ना. प्रतापराव जाधव यांनी

रविवारी (दि. ५) चिखली येथील चिंचोले हॉस्पिटलमध्ये भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी पीडित महिलांना धीर देत, “तुम्ही अजिबात घाबरू नका.

संपूर्ण शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे अशी ग्वाही दिली.
यावेळी केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी या संपूर्ण घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करत, महिलांवर झालेला हा हल्ला अत्यंत निंदनीय असून अशा प्रकारांना समाजात कोणतेही स्थान नसल्याचे सांगितले.
भेटीदरम्यान ना. जाधव यांनी उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी चर्चा करून पीडित महिलांवर योग्य व दर्जेदार उपचार करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, घटनास्थळी उपस्थित असलेल्या चिखली पोलीस ठाण्याचे ठाणेदार भूषण गावंडे यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित सर्व आरोपींवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

यावेळी माध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव म्हणाले, “शिवसेना कधीही चुकीच्या गोष्टीचे किंवा चुकीच्या व्यक्तीचे समर्थन करत नाही. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे आणि पीडितांना न्याय मिळालाच पाहिजे.
याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख विलास घोलप,शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख मायाताई म्हस्के, उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव देशमुख, नगर परिषद उपाध्यक्षा सौ. वैशाली कपिल खेडेकर, उपजिल्हाप्रमुख

“पीडितांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार”

पीडितांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन करताना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रशासनाला निष्पक्ष व सखोल चौकशीचे निर्देश दिल्याने या प्रकरणाला वेग आला असून, दोषींवर कठोर कारवाई करून पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन व शिवसेना कटिबद्ध असल्याचा ठाम संदेश या भेटीतून देण्यात आला

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button