किशोर भाऊ भिडे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष यांच्यावर दुःखाचा डोंगर!!! वडिलांचे दीर्घ आजाराने निधन!!!
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,
तालुका प्रतिनिधी संग्रामपूर, रतन भगत.
संग्रामपूर दिनांक (४/७/२६) सविस्तर वृत्त असे की वंचित बहुजन आघाडी संग्रामपूर तालुक्याचे अध्यक्ष किशोर भाऊ भिडे यांचे वडील श्री दिलीप शालिग्राम भिडे यांचे दिनांक ३ जुलै २०२६ रोजी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच परिसरात हळहळ व्यक्त होत असून विविध राजकीय सामाजिक व सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. बुद्ध वासी दिलीप शालिग्राम भिडे हे शांत मनमिळावू व सामाजिक जाण असलेले व्यक्तिमत्व म्हणून परिचित होते. त्यांच्या निधनामुळे भिडे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाईक, मित्रपरिवार व परिसरातील नागरिकांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. या दुःखातून सावरण्याची तथागत भगवान बुद्ध शक्ती देवो अशी प्रार्थना करू.



