बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

तालुका होमगार्ड समादेशक कार्यालयात स्व. वसंतराव नाईक यांना अभिवादन; जयंती उत्साहात साजरी

तालुका होमगार्ड समादेशक कार्यालयात स्व. वसंतराव नाईक यांना अभिवादन; जयंती उत्साहात साजरी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस चिखली प्रतिनिधी:- सलमान पठाण

तालुका चिखली दिनांक: ०१/०१/२०२६
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरितक्रांतीचे शिल्पकार आणि कृषी विकासाचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त तालुका होमगार्ड समादेशक कार्यालय, चिखली येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी समादेशक अधिकारी तसेच होमगार्ड जवान व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी स्व. वसंतराव नाईक यांच्या कृषी, ग्रामीण विकास आणि शेतकरी कल्याणासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याचे स्मरण केले. तसेच त्यांच्या विचारांचा वारसा जपून समाजसेवा आणि राष्ट्रसेवेसाठी सदैव तत्पर राहण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमात उपस्थितांनी स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button