देऊळगाव राजा येथे ५ लाख २१ हजार रुपयाचा कांदा बियाणे चोरणाऱ्या ३ आरोपिना अटक !

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी : शंकर शिवरकर
देऊळगाव राजा :- परिसरातून गोदाम मधून कांदा बियाणे चोरणाऱ्या टोळीच छडा लावत बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीसाना मोठे यश आले आहे ,
पोलिसांनी या टोळीतील 3 आरोपींना अटक केले असून त्यांच्याकडून 5 लाख 21 हजार 500 रुपयाचा किमतीचा मुद्द्यमाल जप्त केला आहे. यात चोरीला गेलेला कांदा बियाणे 2 मोटरसायकल ,आणि 3 तीन मोबाईल फोनचा समावेश आहे
24 मे च्या रात्री ते 25 मे 2024 च्या पहाटे दरम्यान देऊळगावराजा येथील पिंपळनेर रोडवरील मायो मास क्रिकेट इंडस्ट्री कंपनीच्या आवारातून अज्ञान चोरांनी अर्थ सीड्स कंपनीचे 14 बॅग कांदा बियाणे चोरून नेले होते .या सहा क्विंटर 65 किलो वजनाच्या बियाण्याची किमान चार लाख 65 हजार पाचशे रुपये होती ,या प्रकरणी फिर्यादी मोहम्मद हजर मोहम्मद कलांतर देळगावराजा यांच्या तक्रारीवरून देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करत होते .13 जून रोजी गुप्त बातमी मिळाली .मिळालेल्या माहितीनुसार त्या आधारे पोलिसांनी जालना छत्रपती संभाजीनगर व अहिल्यानगर जिल्ह्यात तातडीने धाडसत्र राबवले ,अत्यंत शिस्त तिने पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आले आरोपी मध्ये अंकुश तेजराव खंदारे ,रा. साठेगाव ता. जाफराबाद जिल्हा जालना विनोद विठ्ठल काळे रा.लोणगाव ता. भोकरदन जि.जालना भानुदास उर्फ राहुल बाबुराव गायकवाड रा.देऊळगाव राजा ह. मु. भास्करवाडी शेवगाव जि.अहिल्यानगर यांचा समावेश आहे पोलिसांनी पकडलेल्या आरोपीकडून चोरीचा सर्व माल जप्त केला आहे .



