नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी स्विकरला पदभार…

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी…
लोकनेते राहुलभाऊ बोंद्रे यांच्या कार्याप्रती प्रदेशाध्यक्ष,पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला कृतज्ञभाव
बुलढाणा : संघटन सृजन अभियानाच्या माध्यमातून बुलढाणा जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी प्रकाश पाटील अवचार यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांचा पदग्रहण सोहळा सोमवार १ जून रोजी जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय जयस्तंभ चौक येथे मोठ्या उत्साहात पार पडला. मावळते जिल्हाध्यक्ष लोकनेते राहुलभाऊ बोंद्रे यांच्याकडून त्यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्विकारला. गत ११ वर्ष राहुलभाऊ बोंद्रे यांनी अध्यक्षपदाची धुरा संभाळत पक्षासाठी दिलेल्या योगदानाबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनदादा सपकाळ यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञभाव व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. तर अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुलभाऊंसोबत फोटो, सेल्फी काढत त्यांनी अध्यक्षपदाच्या काळात केलेल्या संघर्षाच्या आठवणींना उजाळा दिला.
नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील अवचार म्हणाले की, ११ वर्षाच्या काळात अतिशय चांगल्या प्रकारचे काम राहुलभाऊ बोंद्रे यांनी केले आहे. त्यांच्या काळात खूप कमी काळ पक्ष सत्तेवर होता, अशा वेळी संघर्ष करणे मोठे आव्हान असते परंतू ते डगमगले नाही, सरकारला जाब विचारण्याचे काम त्यांनी अहोरात्रपणे केले आहे. राहुलभाऊंच्या माध्यमातून झालेले कार्य पुढे घेऊन जाणार असल्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला. काँग्रेस नेते श्याम उमाळकर, संजय राठोड, लक्ष्ममराव घुमरे यांनी आपल्या मनोगतातून राहुलभाऊ बोंद्रे यांच्या नेतृत्वगुणांवर प्रकाश टाकला. सर्व धर्माच्या, जातीच्या माणसांना सोबत घेवून राहुलभाऊंनी जिह्ल्यात पक्षाचे संघटन मजबूत केल्याचे त्यांनी सांगितले.



