बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

चिखली-बुलढाणा-मलकापूर मार्ग राष्ट्रीय महामार्गात समाविष्ट करण्याची युवासेनेची मागणी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस न्युज प्रतिनिधी सलमान पठाण चिखली

युवासेना जिल्हाप्रमुख नंदूभाऊ कऱ्हाडे यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना देण्यात आले निवेदन

चिखली-बुलढाणा-मलकापूर हा ७१ किलोमीटर लांबीचा मार्ग राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरित करून नवीन व सुरक्षित रस्त्याची निर्मिती करावी, अशी मागणी बुलढाणा जिल्हा युवासेनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात युवासेना जिल्हाप्रमुख नंदूभाऊ कऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सन २००६ मध्ये सुमारे ३८.७६ कोटी रुपयांच्या खर्चाचा हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बुलढाणा अर्बन सोसायटीकडे देण्यात आला होता. २००८ मध्ये रस्त्याचे काम पूर्ण झाले असून कराराचा कालावधी २०३४ पर्यंत आहे. मात्र वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या लक्षात घेता हा मार्ग अपुरा व धोकादायक ठरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २०२१ ते २०२६ या कालावधीत केवळ चिखली ते केळवद या १० किलोमीटरच्या पट्ट्यात ५२ अपघात घडले असून त्यात ३८ जण गंभीर जखमी झाले तर २८ जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण ७१ किलोमीटर मार्गावर गेल्या काही वर्षांत झालेल्या अपघातांची सखोल चौकशी करून जबाबदारांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

तसेच जिल्हाधिकारी यांनी पालकमंत्री, लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन हा मार्ग राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरित करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. टोल व्यवस्थेचे समायोजन करून तसेच संबंधित कंपनीची शिल्लक ठेव शासनाने अदा करून नव्या रस्त्याला मंजुरी द्यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, मागण्यांची दखल न घेतल्यास शिवसेना व युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला असून त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

निवेदनावर युवासेना जिल्हाप्रमुख नंदूभाऊ कऱ्हाडे, श्रीरामभाऊ झोरे, विलासभाऊ सुरडकर, किसनराव घाडगे, प्रीतमभय्या गैची, शिवाजीराव पवार, नारायणभाऊ वाणी, सखाराम पाटील, अशोक राजपूत, हरिभाऊ इंगळे, आनंदभय्या गैची, समाधान जाधव, रवी पेटकर, शंभू गाडेकर, अनिल जावरे, अण्णाभाऊ देवकर, बंडूभाऊ सरसे, शुभम वानखेडे, पुंजाजी शेळके, प्रदीपभाऊ वाघ, वसंता अंभोरे, मोरे सुनील रगड, विष्णू मुरकुटे, राहुल वरवंडे, कृष्णा कदम, प्रकाश शेळके, कौतिकराव जाधव, राजूभाऊ मिसाळ, गजानन कुटे, गजानन साखरे, किशोर डहाळे, मदनराजे आकाळ, बंटी कपूर, हनुमान मुळे, शेख सोहेल, अशोकराव भोसले, मारुतीभाऊ गुजर, मनोहरभाऊ शिंदे, विशाल देशमुख, डीगांबर बंगाळे, बंडू गार्डे, दीपक जाधव, प्रल्हादभाऊ कराडे, विजय जाधव, गजानन फोलाने, प्रदीप इंगळे, विलास ठेंग, गजानन वायाळ, कैलास इंगळे, लक्ष्मण इंगळे, कृष्णा फोलाने, संतोष देशमुख, संतोष सोलट, सतनामसिंग वधवा, सूपडोजी कोराळे, चांगदेवभाऊ पवार, विठ्ठलभाऊ ठेंग, समाधान गायकवाड, कैलासभाऊ गायकवाड, ज्ञानेश्वरभाऊ गायकवाड, डॉक्टर काळे आदी मान्यवरांच्या सह्या आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button