जळगाव जामोद कृषी विभागातर्फे खरीप हंगाम नियोजन व गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न!!!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,
संग्रामपुर तालुका प्रतिनिधी रतन भगत.
दि.२८/५/२६(जळगाव जामोद) सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र शासन कृषी विभाग आत्मा बुलढाणा व कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी तंत्रज्ञानाचा जागर खरीप हंगाम मोहीम२०२६ अंतर्गत खरीप हंगाम नियोजन तसेच कपाशी पिकावरील गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन गुरुवार दिनांक २८/५/२०२६ रोजी माननीय आमदार महोदय जळगाव जामोद यांच्या मार्गदर्शनामध्ये योगा हाल नगरपरिषद जळगाव जामोद येथे घेण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय सौ अपर्णाताई कुटे या उपस्थित होत्या. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री बाळासाहेब व्यवहारे( उपविभागीय कृषी अधिकारी खामगाव )हे होते .तसेच या कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य माननीय श्री विकास जाधव( मुख्याधिकारी जळगाव जामोद नगरपरिषद) यांचे लाभले. या कार्यक्रमात खरीप हंगाम पूर्व नियोजन अल निनोच्या पार्श्वभूमीवर पीक व्यवस्थापन बीज प्रक्रिया मृदा परीक्षण तसेच कपाशी पिकावरील गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी याबाबत माननीय संजय उबाळे सर विषय कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित तज्ञांनी शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतीचे उत्पादन वाढवण्याचे आवाहन केले. तसेच तालुका कृषी अधिकारी श्री रमेश जाधव साहेब यांनी बदलत्या हवामानानुसार शेतीमध्ये करावयाचे बदल याबद्दल तसेच महाविस्तार कृषी ए वन ॲप चे महत्व उपस्थित शेतकऱ्यांना समजावून सांगितले. व शेतकऱ्यांनी महाविस्तार ॲप डाऊनलोड करून घ्यावे असे कळकळीचे आव्हान देखील केले. या कार्यक्रमास तालुक्यातील सर्व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन तालुका कृषी अधिकारी जळगाव जामोद व संग्रामपूर यांच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री केवी भगत साहेब साहेब कृषी अधिकारी यांनी केले. कार्यक्रमासाठी सर्व मंडळ कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी यांनी सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.



