बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

तीस वर्षीय महिलेचा विनयभंग युवकाविरुद्ध गुन्हा दाखल

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव । शहरातील भैरव चौकात दुध डेअरीसमोर एका २५ वर्षीय युवकाने तीस वर्षीय महिलेची छेडखानी करून तिचा विनयभंग केल्याची घटना १७मे रोजी सांयकाळी ५ वाजता सुमारास घडली. पिडीत महिलने घटनेची तक्रार शहर पो.स्टे. दिली असून तक्रारीवरून युवकाविरूध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महिलेने शहर पो.स्टे.ला दिलेल्या तक्रारीनुसार
१७ मे रोजी सायंकाळी ५ वाजता सुमारास फिर्यादी महिला ही ब्युटी पार्लर मधुन घरी जात असताना भैरव चौकातील दुध डेअरी समोर आरोपी शे. मोहसीन शे. अश्पाक (२५) रा. जोगडी फैल हा फिर्यादीसमोर आला व फिर्यादीस विनाकारण वाईट उददेशाने धक्का मारला. त्यावेळी त्याला धक्का का दिला, असे विचारले असता त्याने फिर्यादीला शिवीगाळ केली व विनयभंग होईल असे कृत्य केले.
तसेच आरोपी हा नेहमी फिर्यादीचा पाठलाग करतो, अशा तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरूध्द भान्यासंच्या कलम ७४, ७५, ७८, ३५२ नुसार गुन्हा दाखल करून तपास अधिकारी ग्रेड पोउपनि गजानन गावंडे यांच्याकडे सोपविला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button