शिंदखेडा येथील ह.भ.प. सुधाकर महाजन यांचे दुःखद निधन; परिसरात हळहळ

शोक संदेश दुखत बातमी
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
रावेर ता :
शिंदखेडा येथील ह. भ. प. वैकुंठवासी श्री. सुधाकर घमा महाजन यांचे शनिवार दि. १६ मे २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील एक प्रेमळ व सेवाभावी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
त्यांची अंत्ययात्रा रविवार दि. १७ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, भाऊ, पुतणे असा मोठा परिवार आहे. ते मुक्ताई ऑटो गॅरेजचे संचालक जीवन महाजन व प्रशांत (पप्पू) महाजन यांचे वडील होत.
त्यांच्या निधनामुळे महाजन परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली
रामकृष्ण हरी
8



