बुलढाणामहाराष्ट्र

मोताळ्यात एटीएम फोडून ७ लाख रुपयाची रोकड लंपास….


बुलढाणा जिल्हा (प्रतिनिधी रोकडे
16 मे मोताळा तहसील कार्यालय चौकातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून जवळपास ७ लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आज सकाळी एटीएम फोडण्याची घटना नागरिकांच्या निदर्शनास आली. नागरिकांनी याबाबतची माहिती बोराखेडी पोलिसांना दिली. बोराखेडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे फिरवली आहे. एटीएम फोडण्याच्या घटनेची माहिती मिळताच बुलढाणा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. विशेष म्हणजे हे एटीएम बोरखेडी पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असल्याने पोलिसांच्या गस्त व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी एटीएम मशीन फोडून त्यातील अंदाजे ७ लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे. गेल्या आठवडाभरापासून बोराखेडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरीच्या घटना वाढल्या आहेत. एका महिलेचे लाखो रूपयांचे सोने सुद्धा चोरीला गेले होते. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे. बोराखेडी पोलीस सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून आरोपींचा शोध घेत आहेत. घटनास्थळी फॉरेन्सिक व एलसीबीचे पोलिस निरीक्षक सुनील अंबुलकर हे सुद्धा दाखल झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बोराखडे पोलीस करीत आहेत…

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button