बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

आता महिला बचत गटांचा भरणार आठवी बाजार…ना. अँड आकाश फुंडकरांची संकल्पना

रोकडे बुलढाणा प्रतिनिधी

जी डी रोकडे बुलढाणा प्रतिनिधी खामगाव.. शहरातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना स्थिर बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी नगरपरिषद खामगाव तर्फे दर गुरुवारी महिला बचत गटांचा आठवडी बाजार भरण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. राज्याचे कामगार मंत्री नामदार आकाश फुंडकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन गुरुवारी सकाळी दहा वाजता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदानावर झाले. पंडित दीनदयाल नागरी उपजीविका योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापन झालेल्या महिला बचत गटांना उत्पादन क्षमतेसह विक्रीची संधी मिळावी तसेच यांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे या उद्देशाने आठवडी बाजार सुरू केला जात आहे. शहरातील विविध बचत गटाकडून होणाऱ्या घरगुती हस्तकला, खाद्यपदार्थ ,आणि इतर वस्तूंना या माध्यमातून थेट ग्राहकापर्यंत पोहोचवण्याची संधी मिळणार आहे. या उपक्रमामुळे महिलांना स्वावलंबनाचा नवा मार्ग उपलब्ध होण्याबरोबरच स्थानिक अर्थचक्रालाही चालना मिळेल असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे. कडून विशेषतः मध्यवर्गीय व अल्पभूधारक कुटुंबातील महिलांना रोजगार निर्मितीची संधी मिळणार असल्याचे उपक्रमाकडे आशादायी दृष्टीने पाहिले जात आहे. उद्घाटन सोहळा कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला असून आदिशक्ती बचत गटाचे अध्यक्ष सौ मीनाक्षी वानखडे उद्घाटक म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमास नगराध्यक्ष अर्पणाताई फुंडकर उपाध्यक्ष संतोष पुरोहित नगरपरिषद गटाचे विजय उगले , उद्योगिका मोनिका पण पालिया मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती….

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button