बुलढाणामहाराष्ट्र

“स्व-गणना” जाणून घ्या सोप्या पद्धतीने स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस वर .

कशी करावी “स्व-गणना” जाणून घ्या सोप्या पद्धतीने स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस वर .अधिकाधिक नागरिकांनी स्व-गणनेद्वारे आपली नोंदणी करावी; वर्षा मीना प्रधान जनगणना अधिकारी तथा जिल्हाधिकारी अकोला ! जनगणनेला आता होणार सुरुवात! आमची जनगणना, आमचा विकास पहिल्या टप्प्यात स्व-गणनेला १ मे पासून प्रारंभ . स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस जिल्हा प्रतिनिधी अकोला, दि. २३ एप्रिल २०२६ : लवकरच देशभरात जनगणना कार्यक्रमाची सुरूवात होणार असल्याची माहिती नुकतीच प्राप्त झाली आहे तरी पहिल्या टप्प्यात स्व-गणना दि.१ मे ते १५ मे दरम्यान होणार आहे. स्व-गणनेद्वारे नागरिक आपल्या कुटुंबाची माहिती स्वतः ऑनलाईन भरू शकतात. कशी करावी स्व-गणना या बाबत सविस्तर माहिती पुढे दिलेली आहे. यानिमित्त अधिकाधिक नागरिकांनी आपली नोंदणी करावी, असे आवाहन प्रधान जनगणना अधिकारी तथा जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे. स्व-गणनेची सुविधेमुळे नागरिकांना स्वत: माहिती भरता येणे शक्य आहे. प्रत्यक्ष घर गणना प्रगणकाद्वारे दि.१६ मे ते १४ जून दरम्यान होणार आहे. स्व-गणना प्रक्रियाऑनलाईन नोंदणीचे टप्पे: https://se.census.gov.in या अधिकृत पोर्टलवर जा. कुटुंब प्रमुखाचे नाव आणि १० अंकी मोबाईल क्रमांक नोंदवून ओटीपीद्वारे लॉग-इन करा. आपला जिल्हा, पिन कोड आणि गावाचे नाव निवडा. गुगल मॅपवर आपल्या राहण्याचे ठिकाण निश्चित करा. विचारलेल्या ३३ प्रश्नांची उत्तरे पर्यायांमधून निवडा. माहितीची खात्री करून ‘फायनल सबमिशन’ करा. त्यानंतर आपल्याला ११ अंकी एसई आयडी प्राप्त होईल. हा एसई आयडी जपून ठेवा. जेव्हा प्रगणक तुमच्या घरी येतील, तेव्हा त्यांना हा आयडी दाखवणे आवश्यक आहे. जनगणनेमध्ये इमारत व घर क्रमांक, घराची स्थिती, कुटुंबातील व्यक्तींची संख्या, कुटुंब प्रमुखाचे नाव, लिंग आणि प्रवर्ग. राहण्याच्या खोल्यांची संख्या आणि विवाहित जोडप्यांची संख्या, उपलब्ध सोयी-सुविधा, मालमत्ता, साहित्य आदी माहिती विचारली जाते. स्व-गणना करणे ही एक विशेष डिजिटल सुविधा आहे जी आपला वेळ वाचवते. जर आपण स्व-गणना करू शकला नाही, तरी काळजी करू नका; प्रगणक निश्चित कालावधीत आपल्या घरी भेट देतील. तुमची सर्व माहिती पूर्णपणे गोपनीय आणि सुरक्षित ठेवली जाईल. अकोला जिल्ह्यातील नागरिकांनी स्व-गणना करून राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button