बुलढाणामहाराष्ट्र
पुढचे तीन ते चार दिवस भयंकर उष्णतेची लाट दुपारी बाहेर निघू नका लेकराची काळजी घ्या यंत्रनेकडून अलर्ट

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:-सागर रावणचोरे तालुका प्रतिनिधी शेगाव
बुलढाणा:-नागपूर येथील प्रादेशिक हवामान विभागाने 13 एप्रिल 17 एप्रिल या कालावधीत अकोला बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भ आणि राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. तापमानात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दुपारी बारा ते चार या वेळेत उन्हाची तीव्रता अधिक असल्याने या काळात बाहेर जाणे टाळावे. अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये तसेच जास्त तापमानात शारीरिक श्रमाची कामे टाळावीत. वाहन चालवताना काळजी घ्यावी आणि ज्वलनशील पदार्थापासून,दूर राहावे असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.



