मुबई
नेरूळ एस. बी .आय. कॉलनी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 135 वी जयंती उत्साहात साजरी.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ठाणे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पहुरकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे शिल्पकार आणि सामाजिक समतेचे महानायक होते. त्यांनी अस्पृश्यता निवारण, दलित सक्षमीकरण, कामगारांचे हक्क आणि महिलांना कायदेशीर अधिकार मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. भारतीय संविधानाच्या माध्यमातून त्यांनी सर्व नागरिकांना समान संधी आणि सामाजिक न्यायाचा पाया रचला. नेरूळ एस.बी.आय. येथील स्टेट बँक ऑफ इंडिया वेल्फेअर कमिटी बौद्ध बांधव एकता समिती यांच्या नेतृत्वात मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. यावेळी बँकेतील कर्मचारी तथा बहुतांश बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर आलेल्या सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.



