जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा, वरवट खंडेराव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी…

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,
प्रतिनिधी संग्रामपूर ,रतन भगत.
वरवट खंडेराव-दि.१४/४/२०२६. येथील जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळेत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली .
कार्यक्रमाचे प्रारंभिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री वसंताभाऊ गाळकर यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री राजेंद्र भाऊ गाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त अनेक विद्यार्थ्यांचे वैचारिक प्रबोधन झाले. या जयंती उत्सव प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्यावर आपली मनोगते व्यक्त केली. त्यांच्या संघर्षाची गाथा आणि शिक्षणाचे महत्त्व सांगणाऱ्या भाषणांनी उपस्थित गावकऱ्यांचे मन जिंकले. सदर जयंती उत्सवानिमित्त गावकऱ्यांची तसेच प्रमुख मान्यवरांची उपस्थिती लाभली. १३५ व्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अनेक मान्यवरांनी आणि शिक्षक वर्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री तायडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्री काळे सर , श्री वैतकार सर, श्री मोरे सर, आणि श्री चोपडे सर यांनी विशेष असे परिश्रम घेतले. यावेळी शाळेचे शिक्षक कर्मचारी आणि अंगणवाडी सेविका मदतनीस आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर जयंती उत्सव कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री काळे सर यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेतील उपस्थित मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. एवढेच नव्हे तर उपस्थित विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प ही यावेळी करण्यात आला.



