गुन्हेगारीमहाराष्ट्रमुबई

खळबळजनक; अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत फेक न्यूज पसरवणाऱ्या युट्युबरला बेड्या, सायबर पोलिसांची मोठी कारवाई….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत सोशल मीडियावर दिशाभूल करणारी आणि आक्षेपार्ह माहिती पसरवणाऱ्या एका युट्युबरला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील बुटेगाव येथील उद्धव भगवान कापसे हा तरुण ‘UK न्यूज टाइम’ या नावाचे यूट्यूब चॅनल चालवत होता. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर त्याने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. या व्हिडिओमध्ये त्याने अत्यंत गंभीर आणि बिनबुडाचे आरोप करत हा अपघात नसून भाजपकडून हत्या करण्याचा कट असल्याचा दावा केला होता. या व्हिडिओमध्ये त्याने असेही म्हटले होते की, विमानाची सर्व यंत्रणा सुरळीत होती, मात्र कुणीतरी नेव्हिगेशन सिस्टीम हँग करून विमानावर नियंत्रण मिळवले. तसेच हा संपूर्ण प्रकार राजकीय कट असल्याचेही त्याने सूचित केले होते. या दाव्यांमुळे सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली होती.दरम्यान, या प्रकरणाची दखल घेत भाजपच्या आयटी सेलने मुंबई सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित तरुणाला बुटेगाव येथून अटक केली. त्याच्यावर भारतीय न्याय संहितेतील विविध कलमे तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.न्यायालयाने या आरोपीला १० एप्रिल २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या सायबर पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, आरोपीने अशी संवेदनशील आणि तांत्रिक माहिती कुठून मिळवली, याचा तपास केला जात आहे.या कारवाईनंतर सायबर पोलिसांनी नागरिकांना स्पष्ट इशारा दिला आहे की, कोणतीही अप्रमाणित माहिती किंवा अफवा सोशल मीडियावर पसरवू नये. विशेषतः संवेदनशील विषयांवर चुकीची माहिती पसरवणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button