
श्री संत मुक्ताबाई यात्रेनिमित्त आज दि. 11 फेब्रुवारी 2026 बुधवार रोजी श्री मुक्ताई जुने मंदिरात ध्वजाचे पूजन व आरती करून संत मुक्ताई यात्रोत्सवाची सुरुवात प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आली.
‘याप्रसंगी, संत मुक्ताबाई संस्थान अध्यक्ष ॲड. रवींद्र भैय्यासाहेब पाटील, आमदार चंद्रकांत पाटील यांचे सुपुत्र हर्षराज पाटील, उपनगराध्यक्षा देवयानी शिरसाट, ह.भ.प.रवींद्र हरणे महाराज, उद्धव जुनारे महाराज, ,तहसीलदार वखारे साहेब, निवडणूक नायब तहसीलदार प्रदीप झांबरे तसेच नगरसेवक प्रशांत टोंगे, नितीनकुमार जैन, आमदारांचे स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी, कोथळी सरपंच नारायण चौधरी, युवासेना जिल्हाप्रमुख तथा कोथळी उपसरपंच पंकज राणे, ग्रा. पं सदस्य उमेश राणे, माजी बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, माजी नगरसेवक संतोष मराठे, निलेश शिरसाट, अनिल पाटील, पुरुषोत्तम वंजारी, सुधाकर सापधरे, गणेश लाहोटी, राम जुनारे, गौरव दुट्टे यांच्यासह भाविक-भक्त व वारकरी मोठया संख्येने उपस्थित होते.



