बुलढाणा

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त संग्रामपूर येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद

संग्रामपूर:- ८ एप्रिल २०२६
संविधान निर्माते महामानव विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आज बुलढाणा जिल्ह्यातील तालुका संग्रामपूर येथील पोलीस स्टेशन तामगाव येथे माननीय ठाणेदार सोनवणे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली.या बैठकीस सर्व प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी शांतता कमिटीचे सर्व अध्यक्ष व संग्रामपूर तालुक्यातील भीमउत्सव जयंतीचे सर्व अध्यक्ष उपस्थित होते.कार्यक्रमात संग्रामपूर तालुक्यातील आंबेडकरी समाजातील भीमसैनिक,पक्ष संघटनांचे सर्व अध्यक्ष व त्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.उपस्थितांनी बाबासाहेबांच्या विचारांना अभिवादन करत सामाजिक ऐक्य,शांतता आणि बंधुता राखण्याचा संकल्प व्यक्त केला.
बैठकीदरम्यान जयंती उत्सव शांततेत आणि सुव्यवस्थित पद्धतीने पार पडावा यासाठी विविध बाबींवर चर्चा करण्यात आली. प्रशासन आणि समाज यांच्यात समन्वय राखून उत्सव यशस्वी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button