क्राईमगुन्हेगारीबुलढाणा

अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीस अटक

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव ग्रामीण पोलीस

ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या येऊलखेड येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पो-लीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अप क्रमांक ११८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४ तसेच बाल-कांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ च्या कलम ८ व १२ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.

एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास पीडिता ही आरोपीच्या घराजवळ बदाम वेचण्यासाठी गेली असता, आरोपी

भगवान उत्तम खंडारे वय अंदाजे ५५, रा. येवुलखेड याने तिला घरात बोलावून पाच रुपये देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर अश्लील कृत्य करत पीडितेला अयोग्य प्रकारे स्पर्श करण्यास भाग पाडत तिचा विनयभंग केला, असे तक्रारीत नमूद आहे. घटनेनंतर पीडितेने ४ एप्रिल रोजी आपल्या आईला हा प्रकार सांगितला. त्यानंतर फिर्यादी-ने आरोपीला जाब विचारला असता त्याने चूक झाल्याची कबुली दिल्याचेही समोर आले आहे. अखेर ५ एप्रिल रोजी फिर्यादी, तिचे पती व पीडिता पोलीस ठाण्यात हजर होऊन तक्रार दाखल केली. पुढील तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार जाधव साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गजानन शिंदे पुढील तपास करत आहे,

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button