खानदेशबुलढाणामहाराष्ट्र

हिंगणा कवठळ येथे वादळी वाऱ्याचा कहर; शेतकरी समाधान गावंडे यांचे कांदा पीक जमीनदोस्त….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद

संग्रामपूर:- ३१ मार्च २०२६
संग्रामपूर तालुक्यातील हिंगणा कवठळ मध्ये 30 मार्च रोजी सायंकाळी झालेल्या अवकाळी वादळामुळे अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्याने अक्षरशः कहर माजवला. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या वादळात शेतकरी समाधान तुळशीराम गावंडे यांचे कांदा पीक पूर्णपणे आडवे झाले असून, पिकाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.अचानक आलेल्या या वादळी वाऱ्यामुळे शेतातील उभे असलेले कांद्याचे पीक पूर्णपणे जमिनीवर कोसळले. त्यामुळे काढणीस तयार असलेला कांदा मातीमध्ये दडपला गेला असून, त्याची गुणवत्ता घसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आधीच बाजारभावातील अनिश्चितता आणि वाढलेला उत्पादन खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर या नैसर्गिक आपत्तीमुळे आणखी संकट कोसळले आहे.शेतकरी समाधान तुळशीराम गावंडे यांनी सांगितले की, “कष्टाने उभे केलेले पीक एका क्षणात वाऱ्याने उद्ध्वस्त झाले. आता मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे.” परिसरातील इतर शेतकऱ्यांनाही या वादळाचा फटका बसला असून, अनेक ठिकाणी पिके आडवी झाल्याचे दिसून येत आहे.. या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले असून, वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फिरल्याची भावना व्यक्त होत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी जोर धरत आहे. तसेच, शासनाने लवकरात लवकर मदत जाहीर करावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.अवकाळी हवामानामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला असून, तातडीने मदत मिळणे गरजेचे आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button